शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दक्षिण भारतीय संघटना आली धावून

0
424

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – संपुर्ण महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी-चिंचवडला ही पुराचा फटका बसला आहे. या पुरग्रस्थांना अन्न-पाण्याच्या मदतीची व त्यांना मानसीक धीर देण्यासाठी दक्षिण भारतीय कल्याण संघटना धावुन आली आहे.

या संघटनेने पिंपरी-चिंचवड मधील गुलाबनगर झोपडपट्टी, भारत नगर आणि वंजारी वस्ती कासारवाडी येथील पूरग्रस्तांसाठी खाद्य पॅकेटची व्यवस्था केली. आणि पिंपरी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना मदत साहित्य सुपूर्द केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष पद्मनाब शेट्टी, कार्यकारी अध्यक्ष राकेश नायर, सरचिटणीस सुनील गोपीनाथ, कार्तिक कृष्णा, गणेश अंचन, निधीश नायर यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. तर पालिकेच्या आरोग्य विभागातील हनुमंत पुणतांबेकर, संजय निकम, अरुण तुपे, संजय लांडगे आणि हणूमंत चौधरी यांचे सहकार्य लाभले.