पुनम जाधव, पुजा ढेरंगे ठरल्या सौंदर्यसम्राज्ञी

0
1039

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक-कला-क्रिडा मंच पुणे आयोजित जिल्हास्तरीय सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत सौभाग्यवती गटात नारायण गावची पुनम जाधव तर कुमारी गटात पुजा ढेरंगे प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या. ही स्पर्धा पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी (दि. 21) संपन्न झाली.

महाराष्ट्राची पारंपारिक वस्र संस्कृतीला प्राधान्य देवून विविध फेऱ्या पार करत व मराठी संगीताच्या तालावर पद्क्रमण करत युवतींनी विविध फेरीत मराठी बाणा जोपासत सौंदर्यसम्राज्ञीचे व्यासपिठ गाजवले.

स्पर्धेचे उद्घाटन दिप प्रज्वलन व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, अभिनेत्री कल्याणी चौधरी, चित्रपट निर्माते कैलास वाणी, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, साहित्यिक राजन लाखे, कार्यकारी निर्माता संतोष साखरे, मृणाल गायकवाड, मिसेस हेरीटेज- मॉडेल मृणाल गायकवाड, तेजस्वीनी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार काळभोर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या म्हात्रे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश कोटीकर, महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१८ विजेत्या डॉ. सारिका सावंत व आयोजिका विजया मानमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मानमोडे म्हणाल्या की, ”महिला ह्याच खऱ्या अर्थाने भाषा वाहक आणि संवर्धक आहेत. त्यांच्याच मुळे भाषेत व्यक्त व्हायला आणि आपले सुप्त कलागुणांना सौंदर्य क्षेत्रातही हक्काचे व्यासपिठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञीचे हे व्यासपिठ उभे केलेले आहे.”

मंचच्या वतीने आयोजित मराठमोळी संकल्पना असलेली राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी” २०१९ अंतर्गत ही सौंदर्य प्रतियोगिता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि कोकण भागातील जिल्ह्यात आयोजित केली आहे. ही स्पर्धा आपली मराठी-बोलीभाषांचे संवर्धन आणि साहित्य कला वस्र संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा या मुख्य उद्देशाने आयोजलेली आहे.
दरम्यान, ह्या २०१९ चे सर्व विभागातील जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांची डिसेंबर महिन्यात “महा अंतिम महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१९ चा भव्य सोहळा होणार आहे.

पुणे जिल्हास्तरीय निवड फेरीच्या ८० स्पर्धकातून मुख्य स्पर्धेत एकून २८ स्पर्धकांनी सहभाग घेण्याची संधी मिळाली व ह्या सर्व स्पर्धकांनी “परिचय फेरी, गुणकौशल्य फेरी, सुंदर पद्क्रमण असलेली जोडी, तुझी माझी फेरी, आणि बौद्धिक कौशल्य फेरी अशा चारही मराठमोळी फेरी उत्कृष्टपणे पार पाडत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.
कुमारी आणि सौभाग्यवती गटातील या पुणे जिल्हास्तरीय सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेच्या विजेत्या पुढीलप्रमाणे

सौभाग्यवती गट
प्रथम पुनम जाधव, द्वितीय अश्विनी जानराव, तृतिय डॉ. प्रतिक्षा झगडे

उत्तेजनार्थ
पल्लवी ढोले, विजया आडभाई, निशा परमार, सुर्वणा पालवी, स्वाती एकार

कुमारी गट
पुजा ढेरंगे (प्रथम), पियुषा ढोले (द्वितीय), रिध्दिषा निकम (तृतिय)

उत्तेजनार्थ
अंजली खोमणे, गौरी सोनार

परिक्षक म्हणून मृणाल गायकवाड, कल्याणी चौधरी व उमेश कोटीकर यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश मानमोडे, वैशाली भगोडीया, दिपा माने, मिनल कडू, अभिजित मानमोडे, गौरव भगोडीया, सौरभ पंडीत, वाल्मिक सोणवणे, आभिषेक सुमन, विवेक शिरसाट आणि रोहित मानमोडे, सौरव राठी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सचिन जाधव यांनी तर सुरेश मानमोडे यांनी आभार मानले.