कामतेकर युथ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्ताना अन्न धान्यांची मदत

0
507

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – समाजसेवक अशोक खरात यांच्या वाढदिवस साधेपणाने साजरा करुन सारंग कामतेकर युथ फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना अन्न धान्य पाठवले आहे.  

यावेळी कामतेकर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल हाके, ईश्वर अमंग, उमेश हाके, सागर भोसले, निलेश पवार, बंडू आप्पा, विशाल सावंत, सिध्देश्वर नेंदाणे, संदिप नलवडे आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. लेकरे-बाळे उघड्यावर पडली आहेत. या पुरग्रस्ताना सारंग कामतेकर युथ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्ताना मदत म्हणून अन्न धान्य पाठविले आहे.