…तर त्यास राज्य सरकार जबाबदार असेल – खासदार धैर्यशील माने

0
664

कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – कर्नाटक सरकार अलमट्टी धरणात त्यांची गावे बुडत असतील, म्हणून आमची गावे बुडवत असतील. तर  यापुढे   माझ्या मतदारसंघातून  नक्षलवादी तयार होऊन अलमट्टीच्या धरणावर  गेले.  तर, त्याला  राज्य सरकारच  जबाबदार  असेल,  असा  इशारा हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी  दिला आहे.

अलमट्टी धरणातून हवा तेवढा विसर्ग वाढविला नसल्याबद्दल खासदार माने यांनी संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली. मात्र, सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. २००५ च्या तुलनेत यंदा बारा पट अधिक पाऊस पडला आहे. पण  प्रशासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहे, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

माने यांनी अलमट्टी धराणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे. दोन राज्यांचा हा लवाद आहे. दोन्ही राज्यांनी चर्चा करुन किती विसर्ग कारायचा हे ठरवावे, असे सांगून यापुढे   माझ्या मतदारसंघातून  नक्षलवादी तयार होऊन अलमट्टीच्या धरणावर गेले.  तर, त्याला  राज्य सरकारच  जबाबदार  असेल,  असा  इशारा माने यांनी दिला आहे.