अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत – जितेंद्र आव्हाड

0
480

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. या सरकार नागरिकांच्या बचाव कार्यास उशीर केला आहे. हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे . जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारच्या या जाहिरातबाजीचा तीव्र निषेध केला आहे.

आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने अपत्तीग्रस्ताना १० किलो तांदूळ, १० किलो गहू देण्याची घोषणा केली आहे. मात्र विदारक परिस्थितीत देखील भाजप सरकार जाहिरातबाजी करताना दिसत आहे. पूर ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटांवर सद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चागलेच भडकले आहे.

तसेच सरकारला मदत द्यायला उशीर झाला. रागावू नका, मदत देण्यात येणाऱ्या अन्नधान्य पाकिटांवर स्टीकर लावायचे होते. ते स्टीकर प्रिंट करायला, डिझाईन करायला वेळ लागला. म्हणून मदत वाटायला उशीर झाला. मात्र आता अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत, असे उपोरोधिक ट्विट करत सरकारचे वाभाडे काढले आहे.