महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश

0
692

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडूंनी वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ अंतर्गत झालेल्या आंतर विभागीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.

महाविद्यालयाचा अभिषेक पाटील याने ६९, ऋतुराज गायकवाड याने ८१, किरण जाधव व ऋतुजा पाटील यांनी ७२ तर साक्षी मस्के हिने ५२ किलो वजन गटात सुवर्णपदक संपादन केले. तर ऋषिकेश चव्हाण व निरजकुमार यादव यांनी रौप्य पदक मिळवि.

ज्युडो स्पर्धेत सुवर्ण पदक

महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडू स्नेहल खरे हिने ५२ किलो तर रोहिणी मोहिते हिने ४४ किलो वजनी गटात आंतर महाविद्यालयीन ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केले. या खेळाडूंची नाशिक येथे होणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.