लोकशाहीच्या युध्दात भगवा फडकवू – उध्दव ठाकरे

0
320

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  निवडणूक म्हणजे लोकशाहीतील युद्ध असते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रकारे सर्व मावळे एकजुटीने युद्धात उतरत होते, तसेच आपण सर्वजण निवडणुकीच्या युध्दाला समोरे जाऊन भगवा फडकवू, असा निर्धार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर, कुणबी, माळी,  तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी  चर्चा केली.  त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या समाजातील लोकांच्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ठाकरे म्हणाले की, विविध समाज घटकांना  न्याय मिळवून देणारे सरकार नसेल, तर ते सरकार काय कामाचं? तुमच्यापैकी आज कोणीही आमदार, खासदार नाहीत,  मात्र तुम्ही आमच्याबरोबर आहात. हीच ताकद मला हवी आहे, साधीसुधी माणसंच इतिहास घडवत असतात. त्यामुळे आता इतिहास घडणार नाही, तर तो आम्ही घडवणार आहोत.