व्हर्गीस यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
882

निगडी, दि. ४ (पीसीबी) – आपले वेद, उपनिषदे हे भारतीय संस्कृती पाया तर ज्ञानाचे भांडार आहे. वाचनातून मिळालेले ज्ञान हे दीर्घकाळ मनावर रुजले जाते. तर कविता हि समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. असे मत केरळचे सार्वजनिक बांधकाममंत्री जी सुधाकरन यांनी व्यक्त केले.

निगडी येथील वाग्देवता मल्याळी मासिकाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कवी संमेलनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुवर्णा फायब्रोटेकचे व्यवस्थापकिय संचालक पी. आय व्हर्गीस यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्या प्रसंगी डोंबिवलीच्या होली एजंल्स कॉलेजचे अध्यक्ष डॉ ओम्मन डेविड, माजी प्राचार्य डॉ. ज्युबिली नवप्रभा, कवयित्री रमाप्रसन्न पिशारोडी, झेव्हियर जोसेफ, के एस रवी, आयोजक जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष हरिदास नायर, वाग्देवताचे प्रमुख वेल्लायुद्धन मरार आदी उपस्थित होते.

त्यावेळी दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण मंदिराच्या ४८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले. पुणे, गोवा, मुंबई, बॅंगलोर येथील कविंनी आपल्या कविता सादर केल्या. हरिदास नायर यांनी सुत्रसंचालन तर वेल्लायुधन मरार यांनी आभार मानले.