रहाटणी-काळेवाडीच्या विकासात तापकीर कुटुंबियांचे मोठे योगदान – आमदार जगताप

227

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष व काळेवाडीचे पहिले नगरसेवक बाबासाहेब तापकीर आणि त्यांच्या कुटुंबियांचे काळेवाडी-रहायणी गावच्या विकासामध्ये बहुमूल्य योगदान असून त्यांची परंपरा त्यांच्या कुटुंबियांनीही पुढे अविरतपणे चालू ठेवली आहे. असे गौरवोद्गार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडीत काढले.

तापकीर चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती नगरसेविका सुनिता तापकीर आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

त्यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, स्थायी समिती सभापती विलास मडगिरे, शिक्षण मंडळ सभापती मनीषा पवार, महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न बापु काटे, बाबासाहेब त्रिभुवन, भाजपचे उपशहराध्यक्ष हरेश तापकीर, नगरसेविका आरती चोंधे, निता पाडाळे, शारदा सोनवणे, सविता खुळे, उषा काळे, सामाजिक कार्यकर्ते मगन कोकणे, संतोष कलाटे, नवीन लायगुडे, शुभम नखाते, राहुल खाडे व इतर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.