कश्मीमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योगपती इच्छुक – पंतप्रधान

0
363

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – भारत सरकारने काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० रद्द केल्यानंतर देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरदेखील भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कारण या निर्णयामुळे काश्मीरमध्ये गुंतुवणूकीला मोठी चालना मिळणार आहे. केंद्र सरकारही याबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याच दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी ‘मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजा आड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

तसेच कलम ३७० रद्द केल्यामुळे ‘जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला मोठी चालना मिळू शकेल. अशा निर्णयामुळे एक आर्थिक मजबुती राज्याला मिळेल. ज्यामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले आपल्याला पाहायला मिळतील असेही मोदी यांनी म्हटले आहे.