Ford ने आणली नवीन EcoSport, जाणून घ्या किंमत आणि ‘एसयुव्ही’ची वैशिष्ट्ये

0
436

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी)-  Ford ने आपली लोकप्रिय एसयुव्ही ‘इकोस्पोर्ट’चे नवीन मॉडल भारतीय बाजारात लाँच केले आहे. या ‘एसयुव्ही’ला फ्रेश लूक देण्यासाठी कंपनीने Ford EcoSport Thunder Edition मध्ये कॉस्मेटिक अपग्रेड केले आहेत.

नव्या इकोस्पोर्ट थंडर एडिशनमध्ये सर्वाधिक ब्लॅक थीमचा वापर करण्यात आला आहे. याच्या हेडलॅम्प क्लस्टरवर डार्क फिनिश आणि फॉग लॅम्पच्या चारही बाजूंना ब्लॅक फिनिशिंग आहे. यातील ग्रिल, रुफ आणि रिअर व्ह्यू मिरर ब्लॅक रंगांमध्ये आहेत. दरवाजांवर ब्लॅक स्टिकर आहेत. नव्या इकोस्पोर्टचे 17-इंचाचे अॅलॉय व्हिल्स देखील ब्लॅक रंगात आहेत. बोनटवर देखील ब्लॅक कलरमध्ये ड्युअल टोन फिनिशिंग आहे.

अंतर्गत रचनेबाबत सांगायचं झाल्यास यातील कॅबिनची थीम देखील स्पोर्टी डार्क आहे. यात ड्युअल टोन डॅशबोर्ड आणि डोअर पॅनल व सीट्सला ब्राउन फिनिशिंग आहे. यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, अॅपल कार-प्ले, अँड्रॉइड ऑटो व नेव्हिगेशन सपोर्टसह 9-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आहे.

इंजिन –

इकोस्पोर्टमध्ये 1.5-लीटर, 3-सिलिंडर, पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 121 bhp ची ऊर्जा निर्माण करतं. तर डिझेल इंजिन 1.5-लिटरचं असून हे 99 bhp ची ऊर्जा निर्माण करते. पेट्रोल व्हेरिअंटचा मायलेज 17 किलोमीटर प्रतिलिटर तर डिझेल व्हेरिअंटचा मायलेज 23 किलोमीटर प्रतिलीटर इतका असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 10.18 लाख रुपये (एक्स शोरुम)आणि डिझेल व्हेरिअंटची किंमत 10.68 लाख रुपये(एक्स शोरुम) आहे.