चाकणमध्ये घातक कोयते बाळगणाऱ्या दोघांना अटक

0
407

चाकण, दि. ५ (पीसीबी) – घातक कोयते बाळगणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी आर्म अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार (दि.४) करण्यात आली.

राहुल भागीराथ निकाळे (वय २८, रा. आंबेडकरनगर, चाकण) आणि राहुल गुलाब डोळस (वय २१, रा. राहुल चौक, राजगुरुनगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल निकाळे आणि राहुल डोळस हे दोघेही स्वत:जवल घातक कोयते बाळगत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी या दोघांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील २०० रुपये किमतीचे दोन घातक कोयत्यते जप्त केले आहेत. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.