स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल २ दिवस मदत दिली नाही – धनंजय मुंडे

0
404

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. या सरकार नागरिकांच्या बचाव कार्यास उशीर केला आहे. हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे. तर धनंजय मुंडेंनी या सरकारच्या जाहिरातबाजीचा तीव्र निषेध केला आहे.

फडणवीस सरकारच्या या संधिसाधू प्रवृत्तीला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. हे सरकार केवळ जाहिरातबाजीच्या कामाचे असल्याची टीका अनेक नेत्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील शेलक्या शब्दात सरकारचे माप काढले आहे. सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल २ दिवस मदत दिली नाही.

लेकरे-बाळे उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजी पायी उपाशी माराल लोकांना, असे धनंजय मुंडेंनी या सरकारच्या जाहिरातबाजीचा तीव्र निषेध केला आहे.