मुख्यमंत्र्यांना लोकांच्या जीवापेक्षा जनादेश यात्रा महत्वाची – प्रकाश आंबेडकर

0
358

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील चार जिल्ह्य़ांत भीषण पूरस्थिती आहे. लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत. मात्र, राज्याचे मंत्री पूरस्थितीच्या पाहण्याच्या बहाण्याने पूर पर्यटन करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

वेधशाळेच्या अंदाजानंतरही मुख्यमंत्री मुंबईत न थांबता मोझरीला जनादेश यात्रेत व्यस्त होते. त्यांना लोकांच्या जीवापेक्षा जनादेश यात्रा महत्त्वाची वाटते. हे असंवेदनशील सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  खावटी योजनेत ४८ तासांत प्रत्येकला अडीच हजारांची तातडीची मदत द्यावी लागते. ही रक्कम सुद्धा सरकारने दिली नाही. अडीच लाखांवर लोक पुरात अडकले आहेत. त्यांच्या भोजनाची सोय सरकारने केली नाही. काही स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. सरकारने अजूनही पूरग्रस्तांच्या  पुनर्वसनाच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या नाहीत, याकडे आंबेकडकरांनी लक्ष वेधले.