अमोल कोल्हेंच्या मालिकांचे एक दिवसाचे मानधन पूरग्रस्तांसाठी

149

मुंबई, दि. १० (पीसीबी) – कोल्हापूरमध्ये सलग सहाव्या दिवशी पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर आणि सांगलीकरांना शक्य तितकी मदत सर्वसामान्यही करत आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. अनेक मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अभिनेतेखासदार अमोल कोल्हे यांची निर्मितीसंस्था जगदंब क्रिएशननंदेखील असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. या निर्मितीसंस्थेच्या अंतर्गंत सुरू असणाऱ्या मालिकेच्या टीमने त्यांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जगदंब क्रिएशनने सोशल मिडीयावर पोस्ट करून ही माहीती दिली आहे. ‘जगदंब क्रिएशन या निर्मितीसंस्थेच्या बॅनरखालीस्वराज्य रक्षक संभाजीआणिस्वराज्यजननी जिजामाता दोन मालिकांची निर्मिती सुरू आहे. या दोन्ही मालिकांच्या कलाकारांनी तंत्रज्ञांनी एका दिवसाचे मानधन पूरग्रस्ताना देण्याचे ठरवले आहे. जगदंब क्रिएशन अमोल कोल्हे यांची निर्मितीसंस्था आहे. तसेच, या दोन्ही मालिकांचे निर्मातेही अमोल कोल्हे आहेत.