परळीतील मराठा मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित

0
725

परळी, दि. ७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या २१ दिवसांपासून  मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन ३० नोब्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.

मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत परळी आंदोलनाचे केंद्र असेल आणि सरकारने येथेच येऊन चर्चा करावी. इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल, तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करावयाची आहे, ती येथूनच होईल, अशी भूमिका या ठिय्या आंदोलनातील आंदोलकांनी घेतली होती.