पी चिदंबरम तब्बल १०६ दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत ‘या’ पाच अटींवर मिळाला जामीन

0
363

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून पी चिदंबरम यांचा तिहार तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पी चिदंबरम तब्बल १०६ दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना काही अटी घातल्या आहेत.

जामीन मंजूर करताना घातलेल्या अटी

१) परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही

२) साक्षीदारांना भेटण्यास आणि त्यांना प्रभावित करण्यास मज्जाव

३) माध्यमांना मुलाखती देण्यास बंदी

४) सार्वजनिक मंचावर बोलू नये

५) पुराव्यांशी छेडछाड करु नये