कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना भाजपची उमेदवारी

0
558

पुणे, दि. १ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच साताऱ्यातून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे कायम राखले आहेत. कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिवसेनेला एकही उमेदवारी देण्यात आलेली नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीच्या वरिष्ठांकडे पुण्यात जागा सोडण्याची मागणी केली होती. परंतु भाजप सर्व जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत.