‘ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता, हे विरोधकही मान्य करतील – जितेंद्र आव्हाड

0
433

ठाणे, दि. २२ (पीसीबी) – कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार जितेंद्र आव्हाड हे राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे झाले आहेत, ‘राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याने लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता फक्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाही तर संपूर्ण समाजामध्ये पसरली आहे. कारण ठाकरे म्हटले की मराठी माणसाची अस्मिता हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. सूडाचे राजकारण या देशातील जनता सहन करत नाही, असे म्हणत आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांना आज ईडी समोर चौकशी करता हजर झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे. अशा मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते  बोलत होते.