सरकार विरोधात बोलणाऱ्या कोणालाही देशद्रोही ठरवले जाते – शबाना आझमी

0
383

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – ‘सरकार विरोधात बोलणाऱ्या कोणालाही देशद्रोही ठरवले जाते’, असे म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शबाना आझमी या त्यांच्या अभिनयासोबतच परखड विचारांसाठीही ओळखल्या जातात. एखादा विषय त्यांना खटकला तर त्या लगेच त्यावर व्यक्त होता. मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी देशात घडणाऱ्या घटनांवर त्यांचे मत व्यक्त करत अनेकांचे लक्ष वेधले आहे.

“जर आपल्याला देशाच्या कामकाजात त्रुटी आढळून येत असतील, तर त्यावर खुलेपणाने चर्चा करणे हे तितकेच महत्वाचे आणि गरजेचे आहे, कारण ते देशहितासाठी आहे. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले नाही, किंवा त्यातील त्रुटी समोर आल्या नाहीत तर परिस्थितीमध्ये कधीच सुधारणा होणार नाही”, असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “सध्या पाहायला गेले तर, सरकारवर कोणी टीका केली तर लगेच त्यांना देशद्रोही ठरवले जाते. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतेवेळी त्यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा राजकीय नेत्याच्या नावाचा उल्लेख केला नाही”.  ”भारताचा सांस्कृतिक वारसा पाहता प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळेच तो जतन करण्याचा सगळ्यांकडून प्रयत्न केला जातो”, असे त्या म्हणाला.