शोएब मलिकची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

0
436

इस्लमाबाद, दि. ६ (पीसीबी) – शुक्रवारी झालेल्या बांगलादेश पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.

मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षांपूर्वीच ठरवले होते असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले.

शोएबने व्टिटरवरूनही याबद्दल माहिती दिली. ‘आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, ज्यांनी मला साथ दिली आहे. त्या सर्व प्रशिक्षकांचे आभार , ज्यांनी मला प्रशिक्षित केले आहे. त्याचबरोबर कुटुंब, मित्र, मीडियाचे ही आभार आणि सर्वात महत्वाचे माझे फॅन्स, पाकिस्तान जिंदबाद ‘३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १११ टी -२० मधील अनुभवी खेळाडू शोएब मलिकने २० वर्षांच्या करियरनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात शोएब मलिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारताविद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने शोएब मलिकला शून्यवरच त्रिफळाचीत केले होते.