चिखलफेक करणाऱ्या अधिकाऱ्याचा पाठीशी राज्य सरकार खंबीपणे उभे – चंद्रकांत पाटील

0
429

पुणे, दि, ६ (पीसीबी) – मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने रस्तावर चिखल उडत असल्या करणावरुन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली होती. शेडेकर यांच्या कुटुंबला या  प्रकरणाचा जबर धक्का बसला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिडित कुटुंबांची भेट घेतली. पिडित कुटुंबाचं सांत्वन करून राज्य सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, काळजी नसावी, असे आश्वासन दिले.

नितेश राणे यांनी संतापलेल्या स्वरातच उप अभियंत्याला खड्ड्यांबद्दल जाब विचारला. लोकांच्या अंगावर चिखल उडतो तो तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर पडलेले खड्डे तुम्हाला दिसत नाही का? चिखल उडाल्यावर कसं वाटतं तुम्हीच बघा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा चिखल ओतायचा आदेश दिला. त्यानंतर तातडीने दोन-चार कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या रिकाम्या केल्या.

दरम्यान, याप्रकरणी काल कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.