एवढे भुक्कड आम्ही नाहीत; एकनाथ खडसेचा भाजपला टोला

0
387

मुंबई, दि, ६ (पीसीबी) – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रावेर येथील विधानसभा कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी बोलताना राज्याच्या सर्वोच्च विधानसभा सभागृहात पारदर्शकता मांडणारे भाषण करून विश्वासार्हता वाढली आहे. सभागृहात या महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलण्यासाठी धाडस लागते. पण शासनाच्या माध्यमातून कोणी एक शब्द बोलले नाही याची खंत वाटते. कुणाची आवडती वा नावडती राणी असते पण आपण राजा आहोत. अस विधान केले आहे.

तसेच सरकारमधील निष्क्रियतेला लक्ष केले, येत्या विधानसभा निवडणुकीतील आपल्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना एटीएस, आयकर विभागाच्या चौकश्या लावल्या. चोर्या केल्या की चपाट्या केल्या. एवढे भुक्कड आम्ही नाहीत. विखे पाटील आले तर या. या अन् आम्ही आलो तर चल फूट्टं. अरे कुणी तिकीट देवो की ना देवो ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे आहे असही खडसे म्हणाले.