BSP ऐवजी चुकून BJP समोरील बटन दाबले; मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले

0
402

लखनौ, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. देशभरातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघाचाही या ९५ मतदारसंघांमध्ये समावेश होता. मात्र या मतदारसंघात मतदान करणाऱ्या एका तरुणाने चुकून भाजपाला मत दिल्यामुळे प्रायश्चित म्हणून आपले बोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या या तरुणाने बीएसपी ऐवजी चुकून बीजेपी समोरील बटन दाबल्याने त्याचे मत भाजपा उमेदावराला गेले म्हणून तो निराश झाला होता.