चिखलीत टेम्पोच्या जोरदार धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
548

चिखली, दि. १९ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका इसमाला समोरुन येणाऱ्या एका भरधाव टेम्पोचालकाने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१८) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथील बालघरे वस्ती, रामदेव सुपरमार्केट दुकानाजवळ घडली.

शिवकुमार चेतुराम गौतम असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे साडु भाऊ छोटे नंदलाल गौतम (वय २५, रा. कुदळवाडी पोलीस चौकीच्या मागे, बालघरे यांच्या खोलीत, मुळ रा. रेहरा बजार ता. बरहिया फरिदखान, जि. बलरामपुर, उत्तरप्रदेश) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो (क्र.एमएच/१४/जीयु/२९४७) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिवकुमार हे कुदळवाडी चिखली येथील बालघरे वस्ती, रामदेव सुपरमार्केट दुकानाजवळून पायी चालले होते. यावेळी समोरुन भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या छोटा हत्ती टेम्पो (क्र.एमएच/१४/जीयु/२९४७) वरील अज्ञात चालकाने शिवकुमार याला चिरडले. यामध्ये शिवकुमार गंभीर जखमी झाले. अपघात होताच आरोपी चालक फरार झाला. नातेवाईक आणि स्थानिकांनी शिवकुमार याला तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. चिखली पोलीस आरोपी टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.