काँग्रेसकडून लोकसभेच्या २७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

0
513

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्यात राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. काँग्रेसने आपल्या  २७ उमेदवारांची चौथी यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर केली आहे.  केरळमधून १२, उत्तर प्रदेशमधील ७,  छत्तीसगढमधून ५  तर अरुणाचल प्रदेश २ आणि अंदमान आणि निकोबार बेटमधून १ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, दुसऱ्या यादीत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रातील नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज बब्बर यांना मोरादाबाद येथून तर भाजपच्या माजी खासदार सावित्री फुले यांना बहराईच (उत्तर प्रदेश) उमेदवारी  दिली आहे. तर मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा यांना  पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.