चऱ्होली येथील शेतात अज्ञात महिलेचा खून

0
603

चऱ्होली, १७ (पीसीबी) – चऱ्होली येथील एका शेतात ४० ते ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा अज्ञात हल्लेखोराने डोक्यावर आणि छातीवर वार करून खून केला. ही घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी ७:३० च्या सुमारास चऱ्होली बुद्रुक बुर्डेवस्ती हिरामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या महादेव बुर्डे यांच्या शेतातून समोर आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक फारूख सोलापूरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.