मायावतींनी भाजपशी हातमिळवणी करावी – रामदास आठवले  

0
506

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – समाजवादी पक्षाबरोबर बसपाची आघाडी दीर्घ काळापर्यंत राहू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील  अनेक भागातून आलेल्या अहवालानुसार सपा आणि बसपा समर्थक आघाडीमुळे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजपाबरोबर यावे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले म्हणाले की, भाजपाच्या पाठिंब्याने मायावती उत्तर प्रदेशच्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. सपाबरोबरील आघाडीचा लोकसभा निवडणुकीत अपेक्षित फायदा होणार नाही, हे बसपाच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. सपाऐवजी मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केली पाहिजे.

दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा गोरखपूर, फुलपूर आणि कैरानात पराभव झाला होता. तरीही भाजपा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाली. लोकसभा निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींना मतदान करेन आणि सपा-बसपा आघाडीचा एनडीए पराभव करेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.