वैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती मोर्चा

0
971

 मुंबई, दि. १० (पीसीबी) – अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा  वैजनाथ पाटील याचा आम्हाला अभिमान आहे.  त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असे  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी म्हटले आहे.  

शांताराम कुंजीर म्हणाले की,  गेल्या ३६ वर्षांच्या लढ्याला आणि ४२ तरुणांच्या बलिदानाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. त्यात  सदावर्ते खोडा घालत आहे. त्यांच्याबद्दल समाजात प्रचंड नाराजी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान दिलेले आहे. तसेच माध्यमांसमोर बोलताना ते मराठा तरुणांना चिथावणी देत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, अॅड.सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (सोमवार)  उच्च न्यायालयाबाहेर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते बोलत होते. त्यावेळी एका मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत जालन्याच्या वैद्यनाथ पाटील यांने सदावर्ते यांच्यावर हल्ला  केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  वैजनाथ मूळचा जालन्याचा असून तो कामानिमित्त सध्या पुण्यातील भोसरी येथे राहत आहे.