धुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन

0
780

जळगाव, दि. १० (पीसीबी) – धुळे महापालिकेत भाजपचा ५० जागावर विजय झाला आहे. जनतेने आमदार अनिल गोटे यांना दिलेले हे चोख उत्तर आहे. त्यांना केवळ एक जागा वाचविता आली आहे.  यातून त्यांनी बोध घ्यावा आणि आरोप थांबवावेत, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी  म्हटले आहे.

धुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. या आघाडीला  केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपविरोधात बंड करून  आमदार अनिल गोटे यांनीही ‘लोकसंग्राम’ पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभे करून भाजपला आव्हान दिले होते. मात्र,  त्यांच्या पत्नी हेमा गोटे या एकमेव विजयी झाल्या आहेत.

भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की,  आम्ही दिलेला जनतेला विकासाचा विश्‍वास आणि निवडणुकीचे योग्य नियोजन यामुळेच हा विजय साकार झाला आहे. जनतेचा हा विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. आम्ही पहिल्याच महिन्यात मुख्यमंत्र्याकडून २०० कोटी रूपये मंजूर करून घेवू. धुळ्यात विकास कामासह पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी  आम्ही प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.