रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला धक्का

0
950

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा आज (सोमवार) राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे. आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावर काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती, असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पटेल म्हणाले की, आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणे हा माझ्यासाठी गौरव होता. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. त्यांनी मला खूप सहकार्य केले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. आता वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पटेल यांच्या राजीनाम्यामागे केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यातील वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. १९ नोव्हेंबरला  झालेल्या एका बैठकीसाठी आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातील वाद संपल्याची चर्चा सुरू होती. आता उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याने हा मोदी सरकारसाठी  मोठा धक्का मानला जात आहे.