ऑनलाइन जुगार प्रकरणी तरुणास अटक

PCB Admin
1 Min Read

दि.१३(पीसीबी)-प्रतिबंधित ऑनलाइन बेटिंग वेबसाइटद्वारे जुगार खेळताना तरुणास अटक करण्यात आली. ही कारवाई मुळशी तालुक्‍यातील मारुंजी येथे बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

सचिन प्रभुराम चौधरी (१९, गुरुकृपा रेसिडन्सी, मारुंजी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल कारभारी पालवे (३५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन चौधरी हा वनविन डॉट कॉम या वेबसाईटवरून विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळत होता. बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडून तसेच सिमकार्डच्या आधारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article