जागा देण्याच्या बहाण्याने १.१० कोटींची फसवणूक

1 Min Read

दि.१३(पीसीबी)-जागा खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना २०११ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे जिल्‍ह्याच्‍या मुळशी तालुक्‍यातील जांबे येथे घडली.

राजेंद्र कोंडीबा शितोळे (जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) व हिरामण ज्ञानोबा वाजे (ओंकार कॉलनी, गणेशनगर, थेरगाव पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. तुषार आत्माराम कलाटे (४५, दत्‍त मंदिराजवळ, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलाटे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी कलाटे यांना मुळशी तालुक्यातील जांबे येथील जागा खरेदी करून देतो असे सांगितले होते. त्यासाठी २०११ पासून आरोपींनी वेळोवेळी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्‍याकडून रोख व खात्याद्वारे रक्कम घेतली; मात्र जागा किंवा दिलेले पैसेही परत न देता त्यांची तब्बल एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article