शहराच्या एकतेसाठी धावले पिंपरी-चिंचवडकर; वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस साजरा

0
692

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – भारताचे माजी गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ३१) राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पांढरा झेंडा दाखवून या दौडला सुरुवात झाली.

स्पाईन रोड, चिंतामणी चौक ते वाल्हेकरवाडी याठिकाणी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. चिंतामणी प्रवेशव्दार स्पाईनरोड वाल्हेकरवाडी ते प्राधिकरणातील अ क्षेत्रीय कार्यालयपर्यंत आयोजित एकता दौडमध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक शितल शिंदे, भाजपा प्रदेश सरचिटणीस उमाताई खापरे, दैनिक जनशक्तिचे मुख्य संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके, उद्योजक मिलिंद चौधरी, किरण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, मनपाच्या क्रीडा विभागप्रमुख आशा राऊत, प्रशासकीय अधिकारी पोमण, यासह रवि बर्‍हाटे, डॉ. प्रशांत पाटील, शंकर पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र सांगुकार, अशोक बोडखे, भुषण सरोदे, योगेश महाजन, विकास चौधरी, प्रदीप पटेल, रामदास पाटील, बिभीषण चौधरी, कुशल नेवाळे, ज्योतीताई ढाके, रेखा भोळे, सीमा ढाके, पद्मावती शंकपाळ, गौरी सरोदे, शीतल नारखेडे, यांच्यासह वाल्हेकरवाडी मनपा शाळा, काळभोर नगर मनपा शाळेतील १८०० विद्यार्थी, महिला-पुरुषांनी एकता दौड रॅलीत सहभाग घेतला.