हिंजवडी , दि. ३० – हिंजवडी येथे तीन मित्रांनी मिळून एका मित्राला कपडे काढायला भाग पाडले. त्याला स्वतःच्या प्रायव्हेट पार्टवर आयोडेक्स बाम लावण्यास सांगितले. त्याचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
श्रेयस संजय कवडे (१९, हिंजवडी. मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (२१, हिंजवडी. मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (३५, हडपसर. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण, आरोपी श्रेयस आणि ललित हे तिघे ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत. श्रेयसने पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटी मधील फ्लॅट वर बोलावून घेतले. तिथे राम गंभीरे याने पीडित तरुणाला सिगारेट दिली. ती सिगारेट तरुणाकडून खाली पडली. पीडित तरुणाने सिगारेट उचलून ऍशट्रेवर ठेवली. त्यावरून राम गंभीरे याने पीडित तरुणाला मारहाण केली. तरुणाला कपडे काढण्यास सांगितले. आयोडेक्स बाम त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावण्यास सांगितले. दरम्यान ललित याने या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपी राम गंभीरे याने पीडित तरुणाला ‘तुला कोणाकडे जायचे ते जा. माझ्यावर ५३ केसेस आहेत. माझे कोणी काहीही बिघडू शकत नाही’ अशी धमकी दिली.
कोट –
“तक्रारदार आणि आरोपी दोन मुले एकाच महाविद्यालयात शिकतात. तर गंभीरे हा एकाचा नातेवाईक आहे. घटना उघडकीस आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.”
- विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड












































