मोशी, डूडुळगावच्या भाविकांची बस तुळजापूर घाटात पलटी, महिला ठार, ४० जखमी

1 Min Read

पिंपरी, दि. २९ – 

योगेशभाऊ बबन तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक.3 डुडूळगाव , मोशी, चऱ्होली मधील भाविकांची तुळजापूर भवानी मातेच्या दर्शनाला गेलेली भाविकांची मोठी बस घाटात पलटी झाली. 

मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत.

बसमधील ४५ प्रवासी जखमी असून दोन गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जखमींवर धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार महेश लांडगे सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्याच्या निमित्ताने तसेच टिळेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने  काही बसेस घेऊन मोफत दर्शन आयोजित केले होते. त्यापैकी एक बस सायंकाळी घाटात पलटी झाली. आदिशक्ती आई तुळजाभवानी माता मोफत दर्शनसाठी मोशी, चऱ्होली, 

डूडुळगाव येथील ज्येष्ठ नागरिक गेले होते.



Share This Article