महाळुंगे मध्ये दोन अपघात; तीन जखमी

1 Min Read

महाळुंगे, दि. २९ (प्रतिनिधी)
महाळुंगे येथे अपघाताच्या दोन घटना घडल्या. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. पाईट ते शिरोली रोडवर झालेल्या अपघातात हरिभाऊ मोहन भोकसे (वय ५१), मालन हरिभाऊ भोकसे (वय ४०, कुरकुंडी, खेड) हे जखमी झाले. याप्रकरणी हरिभाऊ यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एलडब्ल्यू ००७४) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ आणि त्यांच्या पत्नी मालन हे दुचाकीवरून जात असताना आरोपी दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकीने हरिभाऊ यांच्या दुचाकीला समोरून धडक देत अपघात केला. अपघात झाल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार पळून गेला.

अपघाताची दुसरी घटना महाळुंगे गावात तळेगाव-चाकण रोडवर घडली. यामध्ये जिशान मुस्ताक पटेल (वय ३१, रा. नाणेकरवाडी, खेड) हे जखमी झाले आहेत. त्यामध्ये रवींद्र बाळासाहेब मोहिते (वय ३२, रा. पिंपरी ठाकरी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल यांच्या दुचाकीला मोहिते याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने जोरात धडक दिली. त्यामध्ये पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत.

Share This Article