- मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे धनादेश सुपूर्द; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
पिंपरी, दि. २७ ऑक्टोबर :दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना या कठीण परिस्थितीत आधार मिळावा, या उद्देशाने ही मदत देण्यात आली.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, दुष्काळामुळे शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून आमदार शंकर जगताप यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले.
..
प्रतिक्रिया:
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे संवेदनशील सरकार असून, समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
शंकर जगताप
आमदार, चिंचवड

