सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कारसारंग यादवाडकर यांना जाहीर

PCB Admin
1 Min Read

माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करणार्या राज्यातील एका कार्यकर्त्याला सजग नागरीक मंचच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देण्यात येतो.
माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करुन मिळालेल्या माहिती आधारे नद्या वाचविण्यासाठी राष्ट्रीय हरीत लवादापासून उच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा देणारे पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांना यंदाचा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदरहू पुरस्कार येत्या रविवारी १ नोव्हेंबर रोजी मंचच्या द्विदशक पूर्ती समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे हस्ते पुण्यातील आय एम डी आर संस्थेच्या सभागृहात होणार असलेल्या कार्यक्रमात देण्यात येईल, अशी माहिती सजग नागरिक मंचचे
अध्यक्ष विवेक वेलणकर आणि मॅनेजिंग ट्रस्टी जुगल राठी यांनी दिली.

Share This Article