भोसरी मधून बुलेट चोरीला

0
263

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – भोसरी मधील सहल केंद्रासमोर पार्क केलेली बुलेट दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी बारा ते रात्री दहा वाजताच्या कालावधीत घडली.

शादाब निजाम पठाण (वय २६, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पठाण यांनी त्यांची ९० हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी भोसरी येथील भोसरी सहल केंद्रासमोर पार्क केली. तिथून त्यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी रात्री दहा वाजता उघडकीस आला. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी मिळाली नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.