घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

1 Min Read

कासारसाई, दि. ४ (पीसीबी) – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञातांनी घरातून ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत कासारसाई येथे घडली.

राजीव गंगाधर नामपेल्लेलू (वय ४७, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून ४.८ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article