‘या’ मराठी अभिनेत्याचा यंदाच्या दहीहंडीला ‘मनसे’ पाठींबा

0
222

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने मुक्काम ठोकला आहे. भारतामध्ये याचा परिणाम हा सण आणि उत्सवांवर होताना दिसत आहे. या सगळ्यात यंदा करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर अभिनेता प्रविण तरडेने यावर कमेंट केली आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. अभिजित यांनी ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे. “विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “१०० टक्के नाचायला येणार” कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. करोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.