सरकारी पक्षाच्या उदासीनतेमुळे खटल्याला पूर्णविराम; दोन चितळांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

bpcauthor
1 Min Read

खासदार, आमदारांविरुद्ध अद्यापही ४०५ फौजदारी खटले प्रलंबित

२००८ मधील दोन चिंकारा आणि दोन सशांच्या कथित शिकार प्रकरणात माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सासवड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी हा निकाल दिला.

हे प्रकरण १५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते. न्यायालयाने वारंवार संधी देऊनही फिर्यादी/अभियोग पक्ष साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आणि खटला पुढे नेण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदींनुसार कार्यवाही समाप्त करून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

२००८ मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात दोन चिंकारा आणि दोन सशांची शिकार केल्याचा आरोप आत्राम आणि त्यांच्या साथीदारांवर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर आत्राम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांना अटकही झाली होती.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या अहवालानुसार खासदार आणि आमदारांविरुद्ध अद्याप ४०५ फौजदारी खटले प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Share This Article