निगडी प्राधिकरण : आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते विकास, अतिक्रमण आणि वाहतूक नियोजनाच्या मुद्द्यावरून निगडी प्राधिकरणात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण व वादळी बैठक पार पडली. आकुर्डी रेल्वे स्टेशन हा आमच्या मागण्यांसाठी पायलट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे एकतर खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करून द्या किंवा तुमच्या नियोजनाप्रमाणे अतिक्रमण हटवून पायलट प्रोजेक्ट प्रत्यक्ष करून दाखवा, तोपर्यंत चालू असलेले सर्व काम पूर्णपणे थांबवा, असा इशारा बैठकीत उपस्थितांनी दिला.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती व सहभाग :सौ. प्रीतम शिंदे (निगडी प्राधिकरण),अपूर्व विश्वनाथ वर्मा,अॅड. संदीप धुमाळ
श्री. प्रसन्न देसाई व त्यांची टीम,शिर्के बिल्डरचे प्रतिनिधी व त्यांची टीम
अतिक्रमण व रस्त्यांच्या समस्येवर आक्रमक भूमिका :
बैठकीदरम्यान परिसरातील खोदलेले व विस्कळीत झालेले रस्ते तसेच वाढत्या अतिक्रमाणावर जोरदार चर्चा झाली. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना होणारा नाहक त्रास खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक प्रतिनिधींनी घेतली. प्रशासनाने आणि कंत्राटदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी योग्य नियोजन करून अतिक्रमण हटवावे आणि पायलट प्रोजेक्टचे काम पारदर्शकपणे पूर्णतःवास नेऊन दाखवावे, अशी मागणी करण्यात आली.
मागण्या पूर्ण होईपर्यंत काम थांबवण्याचा इशारा :
जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही किंवा अतिक्रमाणावर ठोस कारवाई करून नियोजित पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत सध्या सुरू असलेले काम थांबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. आकुर्डी स्टेशन परिसरातील प्रवासी व नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

