पुणे जिल्ह्यातील सोमेश्वरनगर परिसरात विवाहितेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) हिने पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील विष्णुनगर पोलीस ठाण्यात पती किरण भानुदास भोसले याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगिताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे होते, तर सासर रुपे येथे होते. लग्नानंतर पतीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

