अनिश्चित जागतिक परिस्थितीत आपल्या तरुणांसाठी नवीन रोजगार निर्माण करणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. झोहोसह संपूर्ण IT क्षेत्रातील नवीन नोकरभरती सध्या जवळपास थांबली आहे. नवीन कर्मचाऱ्यांवर खर्च होणारा निधी आता AI आणि डेटा सेंटरच्या वाढत्या खर्चाकडे वळवला जात आहे. ऑटोमेशनमुळे वस्तू स्वtस्त होतील, परंतु त्या खरेदी करण्यासाठी लोकांकडे पुरेसे उत्पन्न असणे आवश्यक आहे. यावर काही विचारवंत ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ हा पर्याय सुचवत आहेत. परंतु लोकांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याकडे यापेक्षा अधिक चांगला आणि सक्षम उपाय आहे का, याचा गांभीर्याने शोध घेणे गरजेचे आहे.
श्रीधर वेम्बू
CEO, ZOHO

