लग्न करायचे नव्हते तर मारले कशाला ? – विशाल अग्रवाल यांचा सवाल यापूर्वी ही केला होता मारण्याचा प्रयत्न

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि.२३(पीसीबी)-अत्यंत दुःख आणि जड अंतःकरणाने आम्ही आमच्या समाजासमोर आणि सर्व बांधवांसमोर ही भयावह सत्यकथा मांडत आहोत. आमचा मुलगा केतन विशाल अग्रवाल याला एका पूर्वनियोजित कटातून आमच्यापासून कायमचे हिरावून घेण्यात आले.सिया प्रवीण बसेसर गोयल, पुणे हिने आमच्या साध्या, निरागस मुलगा केतनसोबत विवाहाचे नाटक रचले. तिच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना तिच्या वागणुकीबाबत सर्व माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपवले आणि आमच्यासोबत मोठा विश्वासघात केला.

यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर १८ तारखेला सियाने तिच्या मित्राच्या साथीने आमच्या मुलाची निर्दयीपणे हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. आमचा समाजाला एकच प्रश्न आहे की, जर हे लग्न मान्य नव्हते, तर संबंध तोडले असते; आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती? या अपूरणीय नुकसानीची भरपाई कोण करणार?

मोठी अपडेट अशी की, काल रात्री पोलिसांनी दोन्ही आरोपींना, म्हणजेच सिया आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. तसेच पोलिसांसमोर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.आमची समाजाला थेट सवाल आणि कळकळीची विनंती आहे की, ज्या जवळच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवून आम्ही हे नाते जोडले, त्यांनी आम्हाला अंधारात का ठेवले? त्यांच्या दृष्टीने एका जीवाची काहीही किंमत नव्हती का?

अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या आणि गुन्हेगारी मानसिकतेला साथ देणाऱ्या संबंधित कुटुंबाचा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नातेवाईकांचा समाजाने पूर्ण सामाजिक बहिष्कार करावा का, हा विचार करण्याची वेळ आली आहे.आमची सर्व समाजबांधवांना हात जोडून विनंती आहे की, अशा लोकांशी कोणताही संबंध किंवा नाते ठेवू नये, जेणेकरून उद्या दुसऱ्या कोणत्याही घरातील चिराग विझू नये.एका पीडित आई-वडिलांच्या अंतःकरणातून निघालेला हा आक्रोश आणि न्यायासाठीची हाक आहे. कायदा या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देईलच, मात्र समाजाच्या न्यायालयातही अशा प्रवृत्तींचा कठोर निषेध आणि बहिष्कार होणे गरजेचे आहे.

Share This Article