पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा’डि.लिट’ ने सन्मान

bpcauthor
1 Min Read

पद्मश्री गिरीश प्रभुणे – यांना अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आज ‘डि.लिट’ हि मानद पदवी राज्यपाल महोदय यांचे शुभहस्ते देऊन सन्मानित केलं.

भारत सरकारने यापूर्वी
श्री. प्रभुणे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी या भागात पंचवीस-तीस वर्षाहून अधिक वर्षे भटके विमुक्त समाजासाठी अथक परिश्रम घेऊन,’यमगरवाडी’ प्रकल्प उभा केला. त्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१९७० च्या काळात प्रभुणे यांनी विद्यार्थी अंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यामुळे त्यांना पुणे विद्यापीठाने पदवी परीक्षेला बसू दिले नव्हते. पदवी परीक्षेपासून वंचित रहावे लागले होते. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या स पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी प्रभुणे यांचे अभिनंदन केले.

Share This Article