३३ कोटी देवांचे नाव जपले जाते; परंतू यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करा – सुधीर मनगंटीवार

0
408

वर्धा, दि, २४ (पीसीबी) – आपल्याकडे ३३ कोटी देवांचे नाव जपले जाते, परंतू यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करा आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा करा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असा सल्ला जनतेला देत वृक्ष लागवडीच्या संदर्भात जनजागृती केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित वृक्ष दिंडीचा उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी झाडे लावणे हा स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे. याचा उल्लेख पद्म पुराणात शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या खंड ५८ मध्ये असल्याचही त्यांनी सांगितलं. तसेच आता गडकरींचे नॅशनल हायवे होत आहे, पण स्वर्गात जाण्यासाठी कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरची गरज नाही, त्यासाठी पिंपळाचे वडाचे औदुंबराच्या झाडे लावा आणि स्वर्गात जावा, असं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसारखा दुसरा पर्याय नाही कारण पाणी तयार केले जाऊ शकत नसल्याचे सांगत मुनगंटीवारांनी दुष्काळाची भीषणता जनतेसमोर मांडली.