२ केळी ४४२ रुपयांची देण्यात काहीच गैर नाही- हॉटेल फेडरेशन

0
402

चंदिगढ, दि. ३१ (पीसीबी) – २ केळी ४४२ रुपयांना दिल्यामुळे अभिनेता राहुल बोसने ‘जे डब्ल्यू मॅरियट ‘हॉटेलवर सडकून टीका केल्यानंतर आता फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने ( एफएचआरएआय) ने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. २ केळी ४४२ रुपयांना देण्यात काहीच गैर नसून १८ टक्के जीएसटी आकारणेही योग्यच असल्याची मत फेडरेशनने मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता राहुल बोस चंदिगढच्या जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये उतरला होता. तेव्हा या हॉटेलने २ केळ्यांसाठी राहुलला ४४२ रुपये आकारले होते. यामुळे संतापलेल्या राहुलने व्हिडिओच्या माध्यमातून हॉटेलवर टीका केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि आबकारी विभागानेही याप्रकरणाची दखल घेतली होती. पण एफएचआरआयने आता मॅरियट हॉटेलचा बचाव केला आहे. ‘ एक कप कॉफी रस्त्यावर तुम्हाला १० रुपयांत मिळते पण तीच कॉफी तुम्हाला हॉटेलमध्ये २५० रुपयांत मिळते. कारण त्या हॉटेलमधील इतर सोयी-सुविधांचेही शुल्क त्या कॉफीच्या शुल्कात आकारले जाते. याच न्यायाने २ केळी ४४२ रुपयांत देण्यात काहीच गैर नाही.